Ad will apear here
Next
शिरोळे यांच्या हस्ते साहित्य वाटप
वडगाव शिंदे येथे साहित्य वाटप करताना खासदार अनिल शिरोळे
पुणे :  ‘गाव समृद्ध तर देश समृद्ध ह्या महात्मा गांधींच्या तत्वावर केंद्रातील नरेंद्र मोदी सरकार कार्यरत असून, ‘सांसद आदर्श ग्राम योजने’च्या माध्यमातून गावांच्या विकासासाठी आपण कटिबद्ध आहोत’, असे प्रतिपादन खासदार अनिल शिरोळे यांनी वडगाव शिंदे येथे केले. 

शनिवारी येथे आयोजित करण्यात आलेल्या ग्राम स्वराज्य अभियान कार्यक्रमात ते बोलत होते.  या वेळी  भाजप चिटणीस महेंद्र गलांडे, विनीत वाजपेयी, वैभव शिंदे, मोहन मातेरे, तानाजी लोखंडे, रमेश काकडे, कमल गव्हाणे, ज्योती परिहार, ग्रामपंचायत सदस्य, तसेच गावातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. 

या वेळी  राज्य आणि केंद्र सरकारच्या विविध योजनांच्या लाभार्थ्यांना प्रमाणपत्र, तसेच उपयोगी साहित्याचे वाटप करण्यात आले. यामध्ये सुकन्या समृद्धी, जन धन योजना प्रमाणपत्र वाटप, जिल्हा ग्रामीण केंद्र मार्फत १२ बचत गटांना प्रत्येकी १५ हजार रुपयांचे अर्थसाह्य, पशुसंवर्धन विभाग मार्फत बियाणे, कडबाकुट्टी शाळांना शिक्षणोपयोगी साहित्य, अंगणवाडी केंद्रांना सतरंजी वाटप करण्यात आले.  
 
Feel free to share this article: https://www.bytesofindia.com/P/OZKWBN
Similar Posts
वडगाव शिंदे येथे विविध कामांचे उद्घाटन पुणे : संसद आदर्श गाव योजना व खासदार निधीअंतर्गत वडगाव शिंदे येथील विविध कामांचे उद्घाटन पुण्याचे खासदार अनिल शिरोळे यांच्या हस्ते करण्यात आले. या वेळी आमदार जगदीश मुळीक, सरपंच विजय शिंदे उपस्थित होते.
दिव्यांगांना बॅटरीवरील स्कूटरचे वाटप पुणे : खासदार अनिल शिरोळे यांच्या स्थानिक विकास निधीतून दिव्यांग व्यक्तींना बॅटरीवर चालणाऱ्या स्कूटरचे वाटप करण्यात आले. शिरोळे यांच्या हस्ते दत्ता मिरगणे आणि युवराज नवले या दिव्यांगांना या स्कूटर प्रदान करण्यात आल्या. या वेळी दिव्यांग संघाचे अध्यक्ष दादा आल्हाट, मारुती गिरमे, मोमीन नवले, धनंजय देशमुख, रघुनाथ तिखे आदी उपस्थित होते
खासदार शिरोळेंच्या हस्ते शहीदांच्या कुटुंबीयांचा सन्मान पुणे : शौर्य दिनाचे औचित्य साधून सीमेवर लढता लढता वीरमरण आलेल्या जवानांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी त्यांच्या कुटुंबियांचा व वीरपत्नींचा सन्मान खासदार अनिल शिरोळे यांच्या हस्ते करण्यात आला. येथील स्व. सौ. हिराबाई शिवाजी गलांडे फाउंडेशन व नॅशनल एक्स सर्व्हिसमेन को ऑर्डिनेशन कमिटीतर्फे हा कार्यक्रम आयोजित केला होता
शिरोळे यांची रेल्वे अधिकाऱ्यांशी चर्चा पुणे : शहरातील रेल्वे लाईन्सनजीक राहणाऱ्या नागरिकांच्या सुरक्षेचा आणि स्वच्छतेचा प्रश्न लक्षात घेऊन खासदार  अनिल शिरोळे यांनी ३० डिसेंबरला महापालिका आयुक्त कुणाल कुमार आणि रेल्वेचे विभागीय व्यवस्थापक मिलिंद देऊसकर यांच्यासोबत एक बैठक घेऊन विस्तृत चर्चा केली. ‘एसआरए योजना राबवून या नागरिकांना घरे उपलब्ध करून देण्याविषयी सकारात्मक चर्चा झाली

Is something wrong?
ठिकाण निवडा
किंवा

Select Feeds (Section / Topic / City / Area / Author etc.)
+
ही लिंक शेअर करा
व्यक्ती आणि वल्ली स्त्री-शक्ती कलाकारी दिनमणी
Select Language